अंगावर थरकाप उडवणाऱ्या दिल्लीतील कंझावाला अपघात प्रकरणी वीस वर्षे अंजलीचा ( Anjali Singh)जीव घेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ( DelhiPolice)गाडी मालकासह सहा आरोपींना अटक केली होती. पोलीस सातव्या आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, या प्रकरणातील सातवा आरोपी अंकुशने शुक्रवारी रात्री सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात पोलिसांना शरण आल्याची बातमी आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कंझावाला ( Kanjhawala) येथे अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला कार चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.
तत्पूर्वी शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गाडी मालक आशुतोषला अटक केली होती. आशुतोषने आरोपींना पळून जाण्यास मदत केली होती. आरोपी १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर १ मध्ये पोहोचले होते. यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.