संरक्षण साहित्य प्रदर्शनाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अनील चौहान यांच्या हस्ते उद्घाटन
निबे लिमिटेड या संरक्षण दलांसाठी साहित्य सामग्री उत्पादन करणाऱ्या खासगी क्षेत्रातील कंपनीने आयोजित केलेल्या ' डिफ एक्स्पो २०२३ ' या संरक्षण साहित्य , तंत्रज्ञान प्रदर्शनाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अनील चौहान यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
निबे लिमिटेड च्या द्वीतिय वर्धापनदिनानिमित पुण्यातील चाकण जवळ खालुब्रे एमआयडिसी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संरक्षण क्षेत्रासाठी विविध सामग्री तयार करणाऱ्या खासगी ३७ कंपन्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनाची पाहणी अनिल चौहान यांनी केली. निबे लिमिटेड च्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
निबे लिमिटेड कडून संरक्षण दलांसाठी ब्रिज इक्वीपमेंट, क्रेन्स, नेव्हल स्ट्रक्चर्स, फ्युएल स्टोरेज टँक, मिसाईल लॉंचर स्ट्रक्चर, ऑक्सीजन जनरेटींग प्लांट, केबल वायर हार्नेस, राऊटर्स, कन्सोल अशी अनेक उपकरणे तयार केली जातात. ही उपकरणे आणि सामग्री प्रदर्शनात मांडली होती.रोबो वेल्डींग, इलेक्ट्रीक वाहने, वेल्डींग गँट्री, कुका रोबो,द्रू लेसर मशीन, मशीनगन अशा सामग्रीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
निबे लिमिटेडचे संस्थापक गणेश निबे यांनी स्वागत केले.निबे लिमिटेडचे संचालक गौतम यांनी प्रास्ताविक केले.एच.आर.गायकवाड, भाविक मर्चंट,जे.डी. पाटील, अरूण रामचंदानी, एस.पी. शुक्ला, निखिल मर्चंट,किशोर धारिया रवी निरगुडकर, मिलिंद काळे, आशीष सराफ,हेमंत खत्री, तसेच सैन्यदलाचे एस.जे.पेंडसे, विक्रांत नायक, विकास चावला हे मान्यवर उपस्थित होते.राजेंद्र देशपांडे यांनी निबे लिमिटेडच्या कार्याची माहिती दिली.निबे लिमिटेड, निबे डिफेन्स अॅण्ड एअरोस्पेस लिमिटेड, निबे इ मोटर्स लिमिटेड, निबे शिपयार्ड या कंपन्यांच्या कामाची माहिती दिली.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभेच्छा
संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ' भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी एका दिलाने अत्याधुनिक तंत्राने प्रयत्न करुया. संरक्षण दलासाठी काम करणाऱ्या , आत्मनिर्भर भारतासाठी काम करणाऱ्या कंपन्यांचे स्वागत आहे. संरक्षण दलाच्या . गरजा भागवून समर्थ करण्यासाठी युवा अभियंत्यांनी , उद्योगांनी पुढे यावे. नेव्हल स्टाफ चे उपप्रमुख ( नौसेना उपप्रमुख ) व्हाईस अॅडमिरल सतीशकुमार घोरमाडे यांनी ही दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश साधला. ते म्हणाले, ' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना नौसेना आत्मनिर्भर दल झाले आहे. सर्वांनी केलेले परिश्रम त्याला कारणीभूत आहेत. जवळपास १०० उद्योग आपले नैपुण्य दाखवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.