आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण ; पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता
नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅलर 82 डॉलरपर्यंत खाली आल्याने, पेट्रोल, डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाची क्रूड इन्व्हेंटरी वाढल्याने, कच्च्या तेलाचे दर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव जैसे थेच आहेत. 'एचपीसीएल'च्या माहितीनुसार दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.01 आहे. तर डीझेलचा दर 86.71 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
पेट्रोल -डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाची किंमत आणि रुपयांच्या मुल्यावर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वाढले तर भारतात पेट्रोल,डिझेल स्वस्त होते. या उलट जर कच्च्या तेलाचे दर वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर इंधनाच्या किंमती वाढतात.