#covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या वादावर सरकारचे स्पष्टीकरण
कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सरकार एकीकडे देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या निर्णयावरुन सरकार कोंडीत सापडले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने कोविशिल्डच्या दोन डोसमधील १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय NTAGI या वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशीवरून घेतल्याचे सांगण्यात आले होते. पण मंगळवारी NTAGI च्या काही वैज्ञानिकांनी आपण ही शिफारस केली नव्हती, असे सांगितल्याने केंद्राने हा निर्णय परस्पर घेतला का अशी चर्चा सुरु झाली आहे.
पण या आरोपानंतर NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी डोसमधील अंतर वाढवण्यावर आमच्या गटामध्ये कोणतेही मतभेद नव्हते असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विट करुन हा आरोप फेटाळून लावला आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण करु नका. #covishield च्या ज दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय पारदर्शक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे घेण्यात आला आहे. दोन डोसमधील अंतर वाढवल्याने लसीची परिणामकारकता वाढते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हा निर्णय एकमताने घेतला गेला आहे. कॅनडा, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये एस्ट्राजेन्काच्या दोन डोसमधील अंतरही 12 ते 16 आठवडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.