10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेची वेळ वाढवण्याचा निर्णय
यंदाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ह दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे;
मुंबई // महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीचं सविस्तर वेळापत्रक काल जाहीर झालं आहे. याशिवाय यंदाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ह
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं या गोष्टीची विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. 70, 80, 100 मार्काचे लेखी परीक्षेचे पेपर असतील त्या पेपर साठी 30 मिनिटे अधिक वेळ दिलेला आहे. तर 40, 50, 60 गुणांचे लेखी पेपर असतील त्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ देण्यात आल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.