"पेट्रोल-डिझेल विसरा, आता गाड्या चालवा...." नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Update: 2021-12-25 12:01 GMT

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लवकरच पेट्रोल-डिझेलऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या येतील आणि त्यांची किंमत तेवढीच असेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. येत्या काही महिन्यात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या येतील अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे. नागपुरमध्ये शुक्रवारी अॅग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर देखील उपस्थित होते.

४ चाकी गाड्या 100 टक्के इथेनॉलवर चालवण्याचे धोरण आहे, आणि ते लवकर प्रत्यक्षात आले तर आपल्याला पेट्रोलची गरज राहणार, त्यामुळे लाखो रूपये वाचणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. टीव्हीएस मोटर, बजाज ऑटो यासारख्या दिग्गज कंपन्यांनी फ्लेक्स इंजिन असणाऱ्या टू व्हिलर आणि थ्री व्हिलर बनवाय़ला देखील सुरूवात केली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी नितीन गडकरी यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा दावासुद्धा केला आहे. त्यासाठी स्वत: नितीन गडकरी यांनी आपल्या शेतात ड्रोनजद्वारे करण्यात आलेल्या फवारणीचा व्हिडिओ देखील यावेळी दाखवला.


Full View

Tags:    

Similar News