बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-06-17 05:39 GMT
बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
  • whatsapp icon

पालघर : राज्यात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर सापडला आहे. 

मंगळवारपासून ती बेपत्ता होती, ती सापडत नाही म्हणून कुटुंबियांनी बुधवारी हरवल्याची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बुधवारी सायंकाळी गावकऱ्यांना तिचा मृतदेह आढळला. अंगावर व डोक्यावर मार लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. तिच्यावर बलात्कारही झाल्याच्या संशय व्यक्त केला जात असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News