मोठी बातमी: भारतात कोरोनावरील दुसरी लस तयार, मानवी चाचणीला परवानगी

Update: 2020-07-03 02:07 GMT

भारत बायोटेक या कंपनीने भारतात कोरोनावरील पहिली लस तयार केली आहे. या लसीच्या मानवी चाचणीला सरकारने परवानगी दिलेली आहे.

याच पार्श्वभूमीवर झिडस कॅडीला या कंपनीने देखील कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केलेला आहे आणि या लसीच्या मानवी चाचणीला ड्रग कंट्रोलर अँड जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने परवानगी दिलेली आहे.

ही मानवी चाचणी दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. कंपनीने सादर केलेल्या माहितीमध्ये विविध प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्याचं सांगण्यात आलेले आहे.

हे ही वाचा..

यामध्ये कंपनीने उंदीर, ससे आणि गिनीपिग यांच्यावर या लसीचा वापर केला. यानंतर या प्राण्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसला प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

कंपनीने सादर केलेली माहिती समाधानकारक असल्याचं डीसीजीआयने सांगितलेले आहे. या आधी भारत बायोटेक या कंपनीने ICMR च्या सहकार्याने Covaxin नावाची लस तयार केलेली आहे. या लसीची मानवी चाचणी देखील याच महिन्यात सुरू होणार आहे.

Similar News