सुनेचा जागीच मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी; माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांच्या मुलाचा अपघात
माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जसवंत सिंह यांची सून चित्रा सिंह आणि मुलगा मानवेंद्र सिंह यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातादरम्यान जसवंत सिंह यांची सून चित्रा सिंह यांचा जागीच मृत्यू झाला असून तर मुलगा मानवेंद्र हा आपल्या लहान चिमुकल्यासह गंभीर जखमी झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर हरीयाणा सीमेजवळील अल्वरच्या नौगाव परिसरातील खुशपुरी येथे मंगळवारी सायंकाळच्या वेळी हा अपघात झाला असून या अपघातात बारमेरचे माजी खासदार मानवेंद्र यांच्या पत्नि चित्रा सिंह ह्या जागीच गतप्राण झाल्या. मानवेंद्र सिंह यांच्याशिवाय त्यांचा मुलगा हमीर सिंह देखील गंभीर जखमी झालाय. दोन्ही जखमींची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांना अल्वर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केलं आहे.
दिल्लीहून जयपूरकडे मानवेंद्र हे आपल्या पत्नी आणि मुलासह जात होते. मात्र अचानक त्यांची कार रस्त्यावरच्या डिव्हायडरला धडकली. खरं तर हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजले नाही. या अपघातात त्यांच्या पत्नीला जीव गमवावा लागला. तर मुलगा हमीर सिंहच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. सदरील अपघाताची माहिती मिलताच जिल्हाप्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रूग्णालयात दाखल झालेत. रूग्णालयात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.