दत्ता दळवी यांना अटक ; मुख्यमंत्री शिंदेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
'हा' शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे. सेन्सरने तो शब्द हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर चित्रपटाच्या कलाकार, निर्मात्यांवरही गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.;
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते, तथा मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भांडूप पोलिस स्टेशनबाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर दळवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली माझ्या भूमिकेवर ठाम असणार असल्याचं त्यांनी सांगितले
दत्ता दळवी काय म्हणाले ?
उबाठा गटाचे नेते तथा माजी महापौर दत्ता दळवी यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितलं. धर्मवीर चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांनी ज्या शब्दाचा वापर केला होता, त्याच शब्दाचा वापर मी केला. मालवणी भाषामध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या नाहीत, असेही दत्ता दळवी म्हणाले. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाच राजकारण आहे, असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांच्याकडून समर्थन
दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पोलिस स्टेशन गाठले होते. त्यानंतर त्यांनी दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत असल्याचेही सांगितले. त्याशिवाय दत्ता दळवी काय चुकीचं बोलले? असाही सवाल केला. दत्ता दळवी यांनी भाषणामध्ये शिवसैनिक म्हणून भाषण केले. ते म्हणाले की, आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकाने फोडून काढलं असतं. त्यात काय चुकंच वापरलं. त्यांनी भोस** हा शब्द वापरला. हा शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे.. सेन्सरने तो शब्द हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर चित्रपटाच्या कलाकार, निर्मात्यांवरही गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.