Dasara Melava 2023 : शिवाजी पार्क ठाकरे गट तर आझाद मैदानावर शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याचा आावाज घुमणार

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. कित्येक वर्षे हा दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना उर्जा मिळतं असते. दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं असतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा दुसरा मेळावा असणार आहे.;

Update: 2023-10-24 01:49 GMT

Shivsena Dasara Melava : सहा दशकांपासून चालत आलेली शिवसेना दसरा मेळाव्याची पंरपरा आहे. दादर शिवाजी पार्क येथे शिवतिर्थावर शिवसेनेचा मोठा दसरा मेळावा आयोजिक केला जातो. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा अझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येन दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक पोहचत असतात. शिवसेनेच्या फुटीनंतर आता शिवसेना (उबाठा गट ) आणि शिंदे गट असे गट तयार झाल्याने २०२२ पासून दोन गटाकडून दोन मेळावे घेण्यात येतात. यावर्षी देखीलं दोन मेळावे होणार आहेत शिवसेना शिंदे गटाचा दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दसरा मेळाव्याला अवघे काही तासच उरले आहेत.


शिवाजी पार्कवर ठाकरे गटाच्या मेळाव्याची तयारी

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणारं आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. काही खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खुर्च्यांवर शिवसेनेचे नेते उपनेते आणि पदाधिकारी बसतील. तर त्यामागे शिवसैनिकांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळे कंपार्टमेंट त्यासाठी तयार करण्यात आले आहे. महिलांना बसण्यासाठी स्टेजच्या समोर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सपुर्ण राज्याचं लक्ष लागणारं आहे.

Full View

आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दोन लाख लोक येणार असल्याचा अंदाज व्यक्त आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरील मेळाव्यापेक्षाही विशाल आणि यशस्वी व्हावा, यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे.

Full View

Tags:    

Similar News