दलित असल्याने संस्थाचालकाने केला शिक्षकाचा छळ, शिक्षकाचा मृत्यू, पत्नीचा गंभीर आरोप
दलित असल्याने पतीचं आर्थिक शोषण करुन मानसिक त्रास व वेठबिगारीची वागणूक दिली. त्यामुळे पतीचा मृत्यू झाला. पत्नीचा गंभीर संस्थाचालकावर गंभीर आरोप माझ्या पतीला संस्थाचालकाने आर्थिक शोषण, मानसिक त्रास व वेठबिगारीची वागणूक दिल्यामुळे माझ्या पतीचा ह्रदय विकाराचा झटका आला. असा आरोप करत एका शिक्षकाच्या पत्नीने तिला न्याय मिळावा. म्हणून आमरण उपोषण सुरु केले आहे.
कांचन बनसोडे असं या महिलेचं नाव असून या महिलेने 27 ऑक्टोबर पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या पतीचं नाव बाळासाहेब बनसोडे असं असून त्यांनी शेवगाव तालुक्यातील प्रस्थापित संस्था चालक शिवाजीराव उर्फ विद्याधर आबासाहेब काकडे, व प्राचार्य मछिंद्र फसले, पूर्वीचे समन्वयक संपतराव दसपूते यांच्या त्रासामुळे त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला. असा आरोप सदर महिलेने केला आहे.
गेली 21 वर्ष माझे पती प्रा. बाळासाहेब बनसोडे दलीत कुटुंबातील असल्यामुळे त्यांना आर्थिक शोषण, मानसिक त्रास व वेठबिगारीची वागणूक दिली. यामुळं त्यांचा 26 ऑगस्ट 2020 ला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांनी मृत्यू पूर्वी स्वतः सहा पत्र लिहिले आहेत. त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. की, मी एक केवळ दलित असल्यामुळे माझं जाणीवपूर्वक आर्थिक शोषण केलं जात आहे. व मला पूर्ण वेतन दिलं गेलं नाही. याच मानसिक त्रासातून प्रा. बनसोडे यांचा मृत्यू झाला. सोन्यासारखा संसार उध्वस्त झाला. म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी पैसा नाही, सरांचे गेल्या 21 वर्षापासून पूर्ण वेतन दिले नाही. म्हणून कांचन बनसोडे यांनी संस्था चालक व प्राचार्य यांना पत्र व्यवहार करुन माझ्या पतीच्या हक्काचं वेतन व पेन्शन द्या. अशी मागणी केली.
मात्र, केवळ दलित असल्यामुळं कांचन बनसोडे यांना पतीच्या मृत्यू नंतरही फसवी उत्तर देऊन अपमानीत केलं गेलं. असा आरोप या महिलेने केला आहे. प्राध्यापक बनसोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संस्था चालक शिवाजीराव काकडे, त्यावेळीचे समन्वयक संपतराव दसपुते, प्राचार्य मछिंद्र फसले, पूर्व प्राचार्य भागवत राशिनकर, सहसंचालक एन. यम. कडू यांच्यावर तात्काळ अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व त्याचबरोबर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सदर महिलेने केली आहे.
या संदर्भात आम्ही सदर संस्थाचालक शिवाजीराव काकडे यांच्याशी फोनवरुन त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मृत शिक्षक यांचा पूर्ण वेळ शिक्षकाचा प्रस्ताव आम्ही अनेक वेळा शिक्षण संचानलयाकडे पाठवला आहे. सदर प्रस्ताव शिक्षण संचानालयाकडे अद्यापर्यंत मंजूर झालेला नाही. कांचन ताई यांनी दलित म्हणून त्यांच्या पतीला त्रास दिला असा आरोप केला आहे. मुळात संस्थेमध्ये इतके दिवस काम करत असताना त्यांच्या पतीने कधीही अशी तक्रार आमच्याकडे केली नाही. आमची संस्था हे आमच्यासाठी कुटूंब आहे. आणि कुटुंबातील सदस्याबाबत असं काही वर्तन झाल्यास संस्थेत अजिबात खपवून घेतलं जात नाही.
बाळासाहेब बनसोडे यांची संस्थेकडे कोणतीही थकबाकी नाही. कारण त्यांचं वेतन थेट त्यांच्या बॅकेत जमा केलं जात असे. मात्र, काही राजकीय विरोधक या प्रकरणात कुठलंही तथ्य नसताना राजकीय स्वार्थासाठी सदर महिलेला भरीस घालून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. असं मत Adv. शिवाजीराव काकडे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.