Dahi handi 2022 : गोविंदाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दही हंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.;

Update: 2022-08-19 07:06 GMT

 दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत केली होती.

त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात विचारलेल्य प्रश्नावर उत्तर देतांना दहीहंडी या खेळाला साहसी खेळामध्ये समाविष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. तर जखमी गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोविंदाचे अपघातामध्ये निधन झाले तर त्यांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तर गंभीर जखमी झाल्यास साडेसात लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच हात पाय मोडल्यास पाच लाख रुपये देण्यात येतील. त्याबरोबरच 18 वर्षावरील गोविंदांना महाविद्यालयामध्ये ग्रेस मार्कही मिळतील, असंही स्पष्ट केलं. तर गोविंदांच्या विम्याबाबतचा निर्णय यंदासाठी लागू असणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Tags:    

Similar News