मराठा आंदोलकांवर पुण्यात गुन्हे दाखल

Update: 2024-02-28 07:21 GMT

पुणे : मनोज जरांगे यांच्या सांगण्या नंतर २४ फेब्रुवारी रोजी हडपसर येथील मांजरी फाटा चौका मध्ये रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रस्ता रोको करणाऱ्या २० जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होते. ह्या दरम्यान मनोज जरांगे ह्यांच्या सांगण्या नुसार २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. ह्या वेळी पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी फाटा येथील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलना नंतर हडपसर पोलिसांनी काही आंदोलन कर्त्याना ताब्यात घेतले. काही काळानंतर त्यांना सोडण्यात देखील आले. मात्र पोलिसांकडून दोन दिवसानंतर आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी लावलेल्या जमावबंदीच्या आदेशाचा भंग झाला. असल्याने भादवि कलम 143 सह महाराष्ट्र पोलीस कलम 135 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दाखल फिर्यादी नुसार पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Tags:    

Similar News