रायगडावर विटंबना करणाऱ्यांना अखेर बेड्या

किल्ले रायगडावर पुस्तक प्रकाशनाच्या बहाण्याने रक्षा आणि अस्थि विसर्जनाचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सौरभ करडे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आलं आहे.;

Update: 2021-12-13 09:18 GMT

स्वराज्याची राजधानी असलेले किल्ले रायगड साऱ्यांची अस्मिता आहे, छ. शिवाजी महाराज यांच्या शौर्याने व पराक्रमाने ही भूमी पावन झालेली आहे, त्यामुळे किल्ले रायगडावर कोणतेही आक्षेपार्ह कृत्य होऊ नये यासाठी शिवप्रेमी जागरूक व सतत डोळ्यात अंजन घालून काम करीत असतात. किल्ले रायगडावरील शिवसमाधीनजिक पुस्तक पूजनाच्या बहाण्याने अस्थि आणि रक्षा विसर्जन करण्याचा प्रयत्न करून धर्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवव्याख्याते सौरभ करडे आणि त्यांच्या साथीदारांविरूध्द महाड तालुका पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा चार दाखल करण्यात आला असून चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे .

बुधवार दि . ८ डिसेंबर रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान सौरभ महेश करडे , शैलेश सुरेश वरखडे , ओंकार दिलीप घोलप आणि किरण प्रदीप जगताप हे चौधे शिवसमाधीनजिक हंबिरराव मोहिते यांच्यावरील पुस्तकाच्या पूजनाच्या बहाण्याने राख आणि अस्थि चंदनामध्ये मिसळून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते . या प्रकाराला पूजा झोळे , वैशाली बेलदरे पाटील , प्रदीप बेलदरे पाटील यांनी आक्षेप घेत तो प्रकार उधळून लावला आणि महाड तालुका पोलीस ठाण्याला या प्रकाराची माहिती दिली . त्यानंतर महाड तालुका पोलिसांनी किल्ले रायगडावर जाऊन हे सर्व साहित्य ताब्यात घेऊन तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे . दरम्यान , शनिवारी पूजा झोळे यांनी या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली . त्यानुसार सौरभ महेश करडे , शैलेश सुरेश वरखडे , ओंकार दिलीप घोलप आणि किरण प्रदीप जगताप ( सर्व रा . पुणे ) यांच्याविरुध्द धर्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भादंवि कलम २ ९ ५ , ३४ , १५३ ए , १५३ ए ( १ ) ( ए ) , १५३ ए ( १ ) ( बी ) अन्वये गुन्हा दाखल करुन चौघांनाही पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली . या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे हे करित आहेत .

मास्टरमाईंड शोधावा पूजा झोळे हा प्रकार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याचे समाधन आहे . पण या प्रकरणामागे खरा मास्टरमाईंड कोण आहे त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करणे गरजेचे असल्याचे या प्रकरणातील फिर्यादी पूजा झोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले .

Tags:    

Similar News