वर्धा बंदला उस्फुर्त प्रतिसाद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये विदर्भातील अनेक जिल्हे प्रभावीत झाले असताना कोरोना नियंत्रणासाठी वर्धा इथे लागू केलेल्या संचारबंदीचे आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय अहिव यांनी.....
महाराष्ट्रात काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढत असल्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यातील विदर्भातील महत्वाच्या अमरावती नागपूर यवतमाळ अकोला वाशीम जिल्हाचा समावेश आहे तसेच वर्धा शहर व ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता वर्धा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवार 20 फेब्रुवारी रात्री 8 ते सोमवार 22 फेब्रुवारी सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले होते त्याला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे. नागरिकांनी काळजी घेऊन अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.