#Covid19 : वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबई महापालिकेचे निर्बंध...

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

Update: 2021-02-22 14:19 GMT

मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने आता तातडीने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व चित्रपट गृह, नाट्यगृह, हॉटेल आणि खाजगी कार्यालयांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना परवानगी असेल. समारंभ/कार्यक्रम, खासगी कार्यालये या ठिकाणी मर्यादांचे उल्लंघन केलेले आढळून आले आणि त्या ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे आढळले तर संबंधित व्यक्तींना दंड आकारण्यात येईल तसेच संबंधित आस्थापना /व्यवस्थापन यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत सोमवारी एका विशेष आढावा आणि नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सरव् वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे व वैद्यकीय प्रयोग शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरह निर्बंध

१. आता विवाह सोहळे, जिमखाना /क्लब, नाईट क्लब, उपहारगृहे, चित्रपट गृह, सर्व धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, खासगी कार्यालये आदी सर्व ठिकाणी मास्कचा वापर प्रत्येकाने करणे बंधनकारक आहे. विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी असणार आहे.

२. महानगरपालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तिंना कोविड संबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी अगर खासगी वैद्यकीय प्रयोग शाळांकडून आवर्जून करवून घ्यावयाची आहे.

३. सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोविड बाधितांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे आधी महानगरपालिकेला कळविणे बंधनकारक आहे.

३. बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे चाचणी केल्यापासून २४ तासांच्या आत महानगरपालिकेला कळविणे, तसेच याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर देखील तात्काळ अपलोड करणे बंधनकारक आहे.

४. ज्या व्यक्तिंना कोविड बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु, ज्यांना कोविडची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा लक्षणे नसणा-या रुग्णांचे गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण तात्काळ करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन अशा रुग्णांपासून इतरांना कोविड बाधा होणार नाही.

६. गृह विलगीकरणात असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक आहे. असे रुग्ण सार्वजनिक परिसरात किंवा घराच्याबाहेर वावरताना आढळल्यास त्यांच्याविरोधात 'एफआयआर' दाखल करावा.

७. गृह विलगीकरणात असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी 'वॉर्ड वॉर रुम' द्वारे दररोज ४ वेळा रुग्णांना दूरध्वनी करावेत व त्यांना घरातच राहण्याविषयी पुन्हा-पुन्हा सूचना द्यावी. या अनुषंगाने रुग्णाच्या घरी लॅण्डलाईन दूरध्वनी असल्यास त्यावर प्राधान्याने संपर्क साधावा.

८. कोविड बाधा असलेल्या व लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाची कार्यवाही ही महापालिकेच्या संबंधित विभागाच्या 'वॉर्ड वॉर रुम'द्वारेच करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांनी आपापल्या रुग्णालयातील कोविड खाटांच्या उपलब्धतेची माहिती ही नियमितपणे 'वॉर्ड वॉर रुम'कडे कळवावयाची आहे.

९. महापालिका क्षेत्रातील इमारतींच्या पदाधिका-यांना कोविड विषयक व्यवस्थापनात सहभागी करुन घ्यावे.

१०. ज्या इमारतींमध्ये ५ पेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील कराव्यात

Tags:    

Similar News