काय आहे देशासह राज्यातील कोरोनाची स्थिती?
काय आहे देशासह राज्यातील कोरोनाची स्थिती? पाहा तुमचा जिल्हा ते देशातील रुग्णांची आकडेवारी एका क्लिकमध्ये
आज राज्यात कोरोनाचे ५८ हजार ९२४ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात आज ३५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. रुग्णसंख्येमध्ये आणि रुग्णांच्या मृत्यू संख्येत आज कालच्या पेक्षा घट झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे.
आज ५२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ६,७६,५२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
काय आहे देशाची स्थिती?
देशात आज सोमवारी २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये १ हजार ६१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
सध्या देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर गेली आहे. देशात सध्या Active रुग्णांची संख्या १९ लाख २९ हजार ३२९ इतकी आहे.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -