राज्यात ओमायक्रॉनचे संकट गंभीर झालेले आहे. राज्य सरकारने निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये लग्न समारंभांमधील गर्दी कमी करण्यासही सांगण्यात आले आहे. सामान्य लोक या निर्बंधांचे पालन करत असल्याचे दिसेत आहे. मात्र राजकारणीच या निर्बंधांना हरताळ फासत असल्याचे चित्र आहे.
बीडमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांना झुगारून भाजप नेत्याच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाहाला खासदार, आमदारांसह, माजीमंत्री अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती. माजी आमदार बाजीराव जगताप यांचा मुलगा आणि भाजप नेते मोहन जगताप यांच्या भावाचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नात कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले आहे. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये हा विवाह पार पडला. पण इथे अनेकांना मास्क लावला नव्हता. मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.