कोरोना रुग्णांकडून जादा बिलं घेण्याऱ्या हॉस्पिटल्सची थेट तक्रार करता येणार

Update: 2021-04-16 14:44 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड शिल्लक नसल्याने अऩेक ठिकाणी रुग्णांना खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. पण अनेक खासगी हॉस्पिटल्स अवाच्या सव्वा बिलं उकळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता खासगी हॉस्पिटल्सवर कारवाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी मुंबई शहरातील असे जादा बिल उकळणाऱ्या हॉस्पिटल्सची तक्रार आता थेट ऑडिटर्सना करता येणार आहे. यासाठी फोर्ट / कुलाबा ते वांद्रे भागातील रुग्णांनी COVID19NODAL1@MCGM.GOV.IN तसेच अंधेरी ते दहिसर आणि सायन ते मुलुंड या भागातील हॉस्पिटल्सबाबत तक्रार करायची असेल तर COVID19NODAL2@MCGM.GOV.IN या मेल आयडीवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल्सची बिलं, सविस्तर माहिती आणि कोरोनाचे रिपोर्ट या मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News