साहब कोरोना से डर नहीं लगता लेकीन इस विदेशी पंखे से डर लगता है. ट्वीटरवर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा रुग्णालयातून एका कोरोनाग्रस्त रुग्णाने रुग्णालयाच्या असुविधेवर एक व्हिडिओ तयार करून पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओ?
या व्हिडिओत कोरोनाग्रस्त रुग्ण सांगतोय की, छिंदवा जिल्ह्यातील रुग्णालायात मी भर्ती झालो आहे. रुग्णालयातील आजू-बाजूचा परिसर दाखवत करोना रुग्ण म्हणतोय की, प्रत्येक जण आपआपल्यात व्यस्त आहेत.
परंतु मला कोरोना पेक्षा माझ्या बेड वर लावलेल्या विदेशी पंख्याची सर्वात जास्त भिती वाटते. हा विदेशी पंखा रात्रभर झोपून देत नाही. सतत मनात भिती वाटते की आता पडेल माझ्या अंगावर... या रुग्णालयाच्या स्टाफला मी अनेकवेळा सांगितलं आहे की, हा पंखा बदला नाही तर माझा बेड बदला. परंतु येथे कुणीच ऐकत नाही. सगळे म्हणतायेत हे आमचं काम नाही. मला असं वाटतंय मीच हा पंखा बदलावा का?
मला असं वाटतंय की करोनाच्या आधी हा पंखाच माझा जीव घेईल. आता तुम्हीच सांगा कोणाला बदलायचं... पंखा बदलायचा का, बेड बदलू, रुग्णालयाचा स्टाफ बदलायचा की सरकार ला बदलायचं तुम्हीच सांगा.. कमेंट्स करा... शेअर करा हा विदेशी पंखा कुणाचा जीव घेईल... तुम्हीच सांगा कोणाला बदलायचं नाहीतर माझा बेड बदला म्हणजे 3 गोष्टी बदलाव्या लागणार नाही. ही सद्यस्थिती आहे आपल्या देशाची... हे खरं रुप आहे आपल्या देशाचं असं तो करोनारुग्ण या व्हिडिओत म्हटला आहे.