सुप्रिम कोर्टाच्या दणक्यानंतर मिळणार कोविड मृत्यू प्रमाणपत्र..

कोविड मृत्यूवरुन आजही अनेक ठिकाणी संभ्रम पाहायला मिळत असताना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानं उशिरा का होईना केंद्र सरकारनं कोविड मृत्यू प्रमाणपत्राची मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत.;

Update: 2021-09-12 09:37 GMT

कोव्हिड महामारीच्या संकटात लाखो नागरीकांना मृत्यूमुखी पडावे लागले. कधी मृत्यू घरी झाले तर कधी इस्पितळात. नेमक्या मृत्युक्षणी निदान न झाल्यामुळं अनेकांना कोव्हिड मृत्यू शासकीय लाभापासून वंचित राहीले होते. मध्यंतरी सुप्रिम कोर्टानं यावर कडक भुमिका घेत कोव्हिड मृत्यू निश्चित करण्यासाठी मुदत घालून केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यास सांगितलं आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्र सरकरानं कोव्हिड मृत्यू मार्गदर्शक तत्व जाहीर नं केल्यामुळं संतापून सुप्रिम कोर्टानं तिसरी लाट संपल्यावर मार्गदर्शक तत्व जाहीर करणार का? 11 सप्टेंबर पर्यंत कोव्हिड मृत्यूची मार्गदर्शक तत्व जाहीर करण्याचे आदेश दिले होते.त्यानंर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने संयुक्तरीत्या कोव्हिड मृत्यूची मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत.

कोव्हिड रुग्ण कोण ?

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे RT-PCR टेस्ट, मोलेक्युलार टेस्ट, रॅपिड अॅन्टीजेन किंवा इस्पितळात डॉक्टरांनी तपासून घोषीत केलेला कोव्हिड रुग्ण असेल.

कोव्हिड रुग्ण कोण नसणार ?

विषबाधा, आत्महत्या, हत्या, आणि अपघाती मृत्यू झाल्यास तो कोरोनाबाधीत असला तरी असा व्यक्तिला कोव्हिड मृत्यू प्रमाणपत्र मिळणार नाही.

भारताचे नोंदणी महानिरीक्षकांनी आता सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना नमुना प्रमाणत्र जारी केले आहे. आयसीएमएआरच्या निकषांप्रमाणे ९५

टक्के रुग्णांना कोव्हिड संक्रमण झाल्यानंतर २५ दिवसात कोव्हिड मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच कोव्हिड लागण झाल्यानंतर ३० दिवसात हॉस्पिटल किंवा बाहेर (घरी) रुग्णाचा मृत्यू झाला तरी त्याला कोविड मृत्यू प्रमाणपत्र मिळेल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

कोव्हिड मृत्यू प्रमाणपत्र समिती

कोव्हिड मृत्यू निश्चित करुन प्रमाणपत्र देण्यासाठी आता जिल्हा पातळीवर अतिरीक्त जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा मेडीसीन विभागाचे प्रमुख या समितीवर असतील.

कोव्हिड मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईंकांनी आता पुराव्यासह समितीकडे अर्ज करणे आवश्यक राहील. समिती याची पडताळणी करुन विहीत नमुन्यात अर्ज केल्यानंतर ३० दिवसात कोव्हिड मृत्यू प्रमाणत्र जारी करेल असं मार्गदर्शक सूचनांमधे सांगण्यात आलं आहे.न

Tags:    

Similar News