नागपूरात उभारणार कोविड सेंटर, चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्वीट

Update: 2021-04-25 15:55 GMT

सध्या करोनाची दुसरी लाट राज्यात वेगाने पसरत आहे. करोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालय, बेड, ऑक्सिजन, वेंटिलेटर आणि रुग्णवाहिका या सगळ्याचं सुविधांचा तुटवडा राज्यात होत आहे. करोनाची सद्यस्थिती पाहता अनेक संस्था, सेलिब्रिटी, उद्योगपती इ. आपआपल्या पद्धतीने या संकटकाळात मदतकार्य करत आहे.

नागपूरमध्ये श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्याकडून नागपूर जिल्हा करोना बाधितांसाठी जनता रुग्णवाहिका जनसेवेसाठी देण्यात आली आहे. लवकरच यात्रीनिवास सुद्धा करोना संक्रमित जनतेसाठी कोविड सेंटर कार्यान्वित होत असल्याचं ट्वीट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे फोटो बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

तसेच यावेळी आई जगदंबे, परिस्थितीशी लढायला बळ दे आणि माझ्या नागपूरला, महाराष्ट्राला आणि देशाला या महामारीतून मुक्त कर असं देखील ट्वीट बावनकुळे यांनी केलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाची विदारक परिस्थिती असल्याच सांगत ठाकरे सरकारवर टीका केली होती.

Full View

Tags:    

Similar News