आज राज्यात कोरोनाचे ४४,४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज २९,६४४ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७४% एवढे झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ५५५ इतकी आहे.
त्यामुळं राज्यात कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्येचा आकडा चिंताजनक आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण
राज्यात आज रोजी एकूण ३,६७,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.