देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, रुग्णसंख्या पावणेदोन लाखांवर
देशात कोरोनाचा (Corona) हाहाकार सुरूच आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने (patient Increase) वाढत आहे. त्यातच गेल्या 24 तासात देशात 1 लाख 79 हजार 723 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 146 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Case India) देशात करोना रुग्णांचा स्फोट झाला आहे. तर देशाचा रुग्णवाढीचा दर 13.29 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 4 हजार 33 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 हजार 266 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात राज्यात 207 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर गेल्या 24 तासात 1 लाख 79 हजार 723 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर सध्या देशभरात 7 लाख 23 हजार 619 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच ओमायक्रॉन रुग्णांचीही संख्या वाढल्याने देशाची चिंता वाढली आहे.
राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 44 हजार 338 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच गेल्या 24 तासात राज्यात 12 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 2.04 टक्क्यांवर पोहचला आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.98 टक्के इतका आहे. तसेच रविवारी आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण सांगली जिल्ह्यात आढळले आहेत.