17 देशांकडून चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी, भारतात कोरोनाची परिस्थिती काय?
चीनमध्ये कोरोनाचे (Covid 19 ) रुग्ण वाढल्याने भारत, जपान, थायलंड आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चीन सरकारने (china government) नवीन नियंत्रण योजना जारी केली आहे. या अंतर्गत कोरोना प्रकारांचे निरीक्षण केले जाईल. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, देशात येणाऱ्या प्रवाशांचे स्वॅब नमुने कोरोना प्रकारांच्या निरीक्षणासाठी गोळा केले जातील. त्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.
आतापर्यंत 17 देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे..
स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, यूके, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरियाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. येथे चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट दाखवावा लागेल. मोरोक्कोने आधीच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तैवानने चीनमधून येणाऱ्यांसाठीही कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. पाकिस्तान आणि फिलिपाइन्सही नजर ठेवत आहेत. थायलंड आणि न्यूझीलंडने कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला आहे.
भारतात कोरोनाची परिस्थिती काय?
गेल्या एका आठवड्यात भारतात (India Covid Update) कोरोनाचे 1 हजार 377 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2 हजार 509 सक्रिय प्रकरणे आहेत. शनिवारी, महाराष्ट्रात 2 नवीन रुग्ण आढळले. राज्यात आत्तापर्यंत एकूण 11 लाख 55 हजार 153 प्रकरणे समोर आली आहेत.