आज केंद्रीय कॉंग्रेस कार्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबाबत आपलं दु:ख व्यक्त केलं. तसंच या काळात आपलं कर्तव्य निभावणाऱ्या लोकांना सलाम केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रसरकारवर कोरोणाच्या परिस्थितीवरुन टीका करताना लसीकरणाचं वय २५ वर्ष करण्याची मागणी केली आहे. तसंच अस्थमा, मधुमेह आणि इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्या युवकांना तात्काळ लस देण्याची मागणी केली आहे.
यावेळी सोनिया यानी सरकारने कोरोनाशी लढताना उपयुक्त असणारे उपकरण जीएसटी मुक्त करण्याची मागणी केली आहे. तसंच कोरोना विरुद्धच्या लढाईत अधिक कठोर पाऊल उचलबून गरिबांना महिन्याला ६ हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.