कामगारांच्या प्रश्नावरून प्रियंका गांधी भडकल्या, रोख मदत देण्याची मागणी

Update: 2021-04-20 08:31 GMT

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे पहिल्या लॉकडाऊन प्रमाणेच यावेळेस देखील अनेक कामगार शहर सोडून गावाकडे जात आहेत.

मात्र, मजुरांना आपल्या राज्यात गावात परत जाण्यासाठी सरकारद्वारे कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सरकार योजना करतं मात्र, सरकारच्या योजना या देशातील सर्व घटकांसाठी असाव्यात. मात्र, मागच्या लॉकडाऊन प्रमाणे या लॉकडाऊनमध्ये सरकार कामगारांना विसरलं आहे.

याच भीषण परिस्थितीवर कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्या ट्विटद्वारे म्हणतात -

कोव्हिडची भयानक परिस्थिती पाहता हे तर स्पष्ट होतं की, लॉकडाऊन करावं लागेल. पण स्थलांतरीत कामगारांना पुन्हा खडतर परिस्थितीचा सामना करायला लागत आहे. काय हीच सरकारची योजना आहे.

धोरणं अशी असावीत जी सगळ्यांसाठी योग्य ठरतील. गरीब, कामगार, फेरीवाला यांना रोख रक्कम देण्याची गरज आहे. कृपया या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

असं म्हणत प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला असून कामगारांना मदत करण्याची मागणी केली आहे.

काय आहे देशातील कोरोनाची स्थिती...

देशात गेल्या 24 तासात सुमारे २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये १ हजार ६१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

सध्या देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर गेली आहे. देशात सध्या Active रुग्णांची संख्या १९ लाख २९ हजार ३२९ इतकी आहे.

Tags:    

Similar News