मोठा दिलासा: कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच, रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट
आज राज्यात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५१% एवढे झाले आहे.
आज राज्यात २२,१२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,०१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ३,२७,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.