उत्तर प्रदेशमधील वाराणसी, कानपूर नगर, प्रयागराज, लखनऊ आणि गोरखपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. ही रुग्ण वाढ थांबवण्यासाठी आता अलहाबाद उच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्याचे आदेश योगी सरकारला दिले होते.
हे आदेश योगी सरकारने धुडकावले आहेत. अलहाबाद उत्तर प्रदेशमधील वाराणसी, कानपुर नगर, प्रयागराज, लखनऊ आणि गोरखपुर या जिल्ह्यात न्यायालयाने 26 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले होते.
हे आदेश योगी सरकारने धुडकावले आहेत. जनतेच्या जीवनाचं आणि उपजीविकेचं संरक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे, त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशांवर अंमलबजावणी होऊ शकत नाही. असं म्हणत उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं 'संपूर्ण लॉकडाऊन' लावण्यास नकार दिला आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करत सरकारला लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले होते.