केंद्राचा मोठा निर्णय रेमडीसीवीरची निर्यात थांबवणार, राजेश टोपेंनी केलं स्वागत

Update: 2021-04-11 15:39 GMT

रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्रसरकारने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल. असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील रेमडीसीवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी. अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.

काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडीसीवीर उत्पादकांची बैठकही घेतली होती. त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्दयावर चर्चा करण्यात झाली होती. आज केंद्र सरकारने निर्यात थांबविण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे असेही राजेश टोपे म्हणाले.

Tags:    

Similar News