अर्णबच्या पोलीस चौकशीला कोर्टाची परवानगी

Court permission for Arnab goswami's police inquiry

Update: 2020-11-09 15:28 GMT

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला अर्णब गोस्वामी जामिनासाठी प्रयत्न करत आहे. पण सोमवारीही अर्णबला दिलासा मिळालेला नाही. एकीकडे हायकोर्टाने अर्णबचा जामीन अर्ज फेटाळला. तर दुसरीकडे अलिबाग सत्र न्यायालयाने पोलिसांना अर्णबच्या चौकशीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तळोजा जेलमध्ये पोलिसांना अर्णबची दररोज ३ तास चौकशी करता येणार आहे. अर्णब सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

या प्रकऱणातील इतर दोन आरोपींनीही पोलिसांच्या कारवाईला आक्षेप घेतला आहे. तर अर्णबने कोर्टात जामिनासाठी अर्ज केल आहे. यावर कोर्टाने उद्या सुनावणी ठेवली आहे. दरम्यान अर्णबने पोलिसांच्या कारवाईला दिलेल्या आव्हानाबाबत कोर्ट उद्या निर्णय़ देण्याची शक्यता आहे.

दरम्यान अलिबागच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याला पोलिसांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरदेखील सोमवारी सुनावणी झाली.

Tags:    

Similar News