Baba Ramdev : पतंजलीच्या ४० हजार कोटींच्या टर्नओव्हरचे रहस्य बाबा रामदेव यांनी उलगडले...

माझा वेळ अदाणी आणि अंबानीच्या मौल्यवान असल्याचे पतंजलीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांनी गोव्यामध्ये सांगितले. यावेळी बाबा राबदेव यांनी पतंजलीच्या ४० हजार कोटींच्या टर्नओव्हरचे रहस्य सुद्धा उलगडले.;

Update: 2023-02-20 07:44 GMT

 जगप्रसिद्ध योगगुरु रामदेव बाबा हे दरवेळी आपल्या वक्तव्याने चर्चेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी त्यांनी गोव्यामध्ये एक ताजे वक्तव्य करत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक ९९ टक्के आपला वेळ स्वत:चा स्वार्थ साधण्यात घालवतात, असे वक्तव्य रविवारी गोव्यात रामदेव बाबा यांनी केले आणि एकच खळबळ उडवून दिली. तर माझ्यासारखे साधू स्वत:चा वेळ समाजाच्या भल्यासाठी खर्ची घालत आहेत. बाबा रामदेव गेले तीन दिवस गोव्यात मुक्कामास होते. तेव्हा त्यांनी माझा वेळ हा अदाणी आणि अंबानी सारख्या अब्जाधीशांपेक्षाही मौल्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा रामदेव यांचे हे विधान सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

बाबा रामदेव यांनी आपल्या भाषणात कॉर्पोरेटमधील भांडवलदार ९९ टक्के हा वेळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी खर्च करतात. तर देशातील साधू, महात्मे हे स्वत:चा वेळा हा समाजाच्या उत्थानासाठी वापरतात. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आचार्य बालकृष्ण यांचे सुद्धा कौतुक केले. पतंजली कंपनीला पुनर्जीवित करण्याचे काम करुन कंपनीचा आर्थिक वर्षात ४० हजार कोटी रुपयांच्या टर्नओव्हरवर पोहचवले असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.

तोट्यात चालणाऱ्या कंपनीला आचार्य बाळकृष्ण यांनी व्यावसायित दृष्टीकोन, पारदर्षी व्यवस्थापन आणि उत्तरदायी नेतृत्त्व दिल्यामुळे पतंजलीचा टर्नओव्हर हजारो कोटींवर पोहचला आहे. भारताला परम वैभवशाली बनवण्यासाठी पतंजली सारखे साम्राज्य देशभरात उभे करण्याची गरज असल्याचे मत बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले. 

Tags:    

Similar News