10 दिवसापुर्वीच ऑक्सिजनसाठी मोदी सरकारला केलं होतं अलर्ट, अधिकाऱ्यांच्या सुचनेकडे सरकारचं दुर्लक्ष

Update: 2021-04-26 07:19 GMT

"ऑक्सिजनचा प्रबंध करा, 20 एप्रिलला कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख होईल आणि एप्रिलच्या शेवटी ती 5 लाखांपर्यंत जाईल'' अशी सूचना नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सरकारला केल्याचं समोर आलं आहे.

डॉ. वी के पॉल यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष हा इशारा दिला होता. देशात कोव्हिड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसंच देशाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडेल. यावेळी त्यांनी दिवसाला 6 लाख रुग्ण आढळतील असा देखील इशारा दिला होता. तसंच ही सर्व माहिती ग्रुप 2 ला देण्यात यावी. ग्रुप 2 वरच देशातील ऑक्सिजन आणि आरोग्य क्षेत्रातील उपकरणांची व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागाचे प्रमुख औद्योगिक विकास विभागाचे सचिव डॉ गुरुप्रसाद महापात्र आहेत.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पॉल यांनी हा इशारा दिला होता. यावेळी पॉल यांनी प्लान बी तयार ठेवा असं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारने राज्य सरकारला कठीण पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या. मात्र, केंद्र सरकारने पॉल यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. जनसत्ता ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

Tags:    

Similar News