हवेतून कोरोनाचा प्रसार होण्यावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब
लक्षात ठेवा; लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीकडून देखील कोरोना व्हायरसचा फैलाव होतोय: केंद्र सरकार;
परवा प्लाज्मा थेरेपी ला बंदी तर काल रेडीमसीर औषधावरची बंदी केंद्र सरकार रोज नव्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी करून नागरिकांना कोरोनाविरोधात सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. लँन्सेट या इंग्रजी विज्ञान विषयक प्रतिथयश नियतकालिकाने काही महिन्यापूर्वी करुणा चे नव या स्त्रियांचे विषाणू हवेतून पसरतात असल्याचं म्हटलं होतं.
केंद्र सरकारने आता उशिरा का होईना हा दावा मान्य करत कोरोनाबाधित रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात, तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात असं कबूल करत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे
कोरोनाबाधित व्यक्तीची लाळ आणि नाकातून शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब श्वास घेताना अथवा बोलताना, गाताना, हसताना, खोकताना बाहेर पडल्यामुळे कोरोना व्हायरसचे वाढते. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीकडून देखील कोरोना व्हायरसचा फैलाव होतो. हे ध्यानात ठेऊन लोकांनी मास्क वापरणे चालू ठेवावे, एकावर एक असे दोन मास्क किंवा एन 95 मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे.
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या गाईडलाईनमध्ये असं म्हटलं आहे की, ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांच्याकडून संसर्ग होऊ शकतो. सरकारने वेंटिलेशनची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. चांगल्या वायुवीजन असलेल्या ठिकाणी संसर्ग पसरवण्याचा धोका कमी असतो. पंखे योग्य ठिकाणी लावावा आणि दारे, खिडक्या थोड्या उघड्या ठेवल्यास हवेची गुणवत्ता देखील सुधारते. खिडक्या आणि दारे बंद ठेवून, संक्रमित हवा खोलीत सतत गोळा होत राहते. यामुळे दुसर्या व्यक्तीलाही हा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.
या व्यतिरिक्त सध्याच्या घडीला लोकांना डबल मास्क किंवा एन -95 मास्क घालायचा सल्ला देण्यात आला आहे. सर्जिकल मास्कसह आणखी एक मास्क घालता येऊ शकतो. सर्जिकल मास्कच्या जागी दोन सूती मास्क देखील घातले जाऊ शकतात. सर्जिकल मास्क फक्त एकदाच वापरला पाहिजे. याशिवाय दरवाजाची हँडल, स्विचबोर्ड, टेबल-खुर्च्या अशा अधिक संपर्कात येणार्या वस्तू स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, असं सरकारने सूचवलं आहे. या व्यतिरिक्त सध्याच्या घडीला लोकांना डबल मास्क किंवा एन -95 मास्क घालायचा सल्ला देण्यात आला आहे. सर्जिकल मास्कसह आणखी एक मास्क घालता येऊ शकतो. सर्जिकल मास्कच्या जागी दोन सूती मास्क देखील घातले जाऊ शकतात. सर्जिकल मास्क फक्त एकदाच वापरला पाहिजे. याशिवाय दरवाजाची हँडल, स्विचबोर्ड, टेबल-खुर्च्या अशा अधिक संपर्कात येणार्या वस्तू स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, असं सरकारने सूचवलं आहे.
मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा असलेल्या इमारतींमध्ये एअर फिल्टरेशन कार्यक्षमता सुधारणे उपयुक्त ठरते. कार्यालये, सभागृह, शॉपिंग मॉल्स इत्यादींमध्ये गॅबल फॅन सिस्टम आणि रूफ व्हेंटिलेटर्स वापरण्याची शिफारस केली जाते. फिल्टर्सची वारंवार साफसफाई आणि ते बदलण्याची शिफारस केली जाते.
देशात काल जवळपास अडीच कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत देशातील पावणेतीन लाख लोकांना कोरोनामुळे मृत्युमुखी पडावे लागले असून राज्यातील मृतांची संख्या ही पाऊन लाख इतकी आहे काल महाराष्ट्रात 28 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.