चीनमध्ये (chian)कोरोनाची (corona) रुग्णसंख्या वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चीनच्या पेकिंग विद्यापीठाच्या संशोधनानुसार, 11 जानेवारी पर्यंत देशाच्या लोकसंख्येच्या 64% म्हणजेच 900 दशलक्ष लोकांना संसर्ग झाला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, गान्सू प्रांतातील 91% लोकसंख्या, हेनान प्रांतातील 89% लोकसंख्या, युनानची 84% लोकसंख्या आणि किंघाई प्रांताची 80% लोकसंख्या संक्रमित आहे.
गेल्या 24 तासांत भारतात 174 नवीन रुग्ण आढळले आहेत. एका मृत्यूची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 1हजार 336ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून आतापर्यंत देशात ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे...
8-12 जानेवारी दरम्यान 4 लाखांहून अधिक एंट्री आणि एक्झिट ट्रिप करण्यात आल्या. 8 जानेवारी रोजी चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा उघडल्या. तेव्हापासून 4 लाखांहून अधिक लोक चीनमध्ये आले आणि तेथून इतर देशांमध्ये गेले. लोकांसाठी क्वारंटाईनसारखा मोठा प्रोटोकॉलही रद्द करण्यात आला आहे. 8 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान 4 लाख 90 हजार एंट्री आणि एक्झिट ट्रिप झाल्या असल्याच्या अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हंटले आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार लोक चीनमध्ये आले आणि 2 लाख 40 हजार लोक चीनमधून इतर देशांमध्ये गेले आहेत.
कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत 67 कोटी 5 लाख 62 हजार 18 रुग्ण आढळले आहेत. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान येथे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जगातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूची प्रक्रिया वाढू लागली. आतापर्यंत 67 लाख 24 हजार 996 मृत्यू झाले आहेत.