लॉकडाऊन लावल्यानंतर आज पहिल्या दिवशी राज्यात नवीन ६१ हज़ार ६९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात तासाला २ हजार ५७० रुग्ण आढळत आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६ लाख २० हज़ार ०६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दिवसभरात ५३,३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आत्तापर्यंत राज्यात एकूण २९,५९,०५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे.
राज्यात आज ३४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण