Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घसरण कायम, मृत्यूसंख्या वाढली
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत होता. मात्र सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट नोंदवली गेली आहे. मात्र मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे.;
गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत होता. मात्र सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या आकडेवारीत घट झाली आहे. मात्र मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 3 लाख 33 हजार 533 रुग्ण आढळून आले आहेत. तर 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 704 इतके रुग्ण आढळून आले होते. तर त्यामध्ये 4 हजार 171 रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर देशात सध्या 21 लाख 87 हजार 205 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 2 लाख 59 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच आतापर्यंत 3 कोटी 65 लाख 60 हजार 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील नागरीकांना आतापर्यंत 161 कोटी 92 लाख 84 हजार 270 लसींचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी कमी होत असली तर तज्ज्ञांनी तिसरी लाट कायम असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केली.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 46 हजार 393 रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याबरोबर 94.3 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.