Covid Update : दिलासादायक ! देशात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण अधिक
- गेल्या काही दिवसात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. त्यातुलनेत कोरोनामुक्त रुग्णसंख्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा कमी होती. मात्र बुधवारी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णसंख्या आढळून आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.;
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. मात्र त्यातुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी होती. मात्र बुधवारी कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आढळून आली आहे. 16 डिसेंबरनंतर पहिल्यांदाच नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
देशात गेल्या 24 तासात 2 लाख 99 हजार 73 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 85 हजार 914 नव्या रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच गेल्या 24 तासात देशात 665 मृतांची नोंद झाली आहे. मृत्यूसंख्येत वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
देशात सध्या 22 लाख 23 हजार 18 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशाचा रुग्णवाढीचा दर 16.16 टक्क्यांवर पोहचला आहे. तर आतापर्यंत देशातील 163 कोटी 58 लाख 44 हजार 536 लोकांना लस देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने साडेतीन लाखांचा टप्पा गाठला होता. मात्र आता रुग्णसंख्येत घट होण्याबरोबरच कोरोनामुक्त रुग्णांची वाढली असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.