धक्कादायक! शौचालयात आढळला कोरोना रुग्णाचा मृतदेह

राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना, वैद्यकीय सेवा अपुरी पडत आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.;

Update: 2021-03-30 13:47 GMT

शौचालयात गुदमरून मृत्यू झालेल्या रूग्णांच गुलाबराव ढवळे असे नाव आहे. ढवळे हे तब्बल साडेचार तास ऑक्सिजन विना शौचालयात पडून होता. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

ढवळे स्वच्छतागृहात जाऊन बराच वेळ झाला असून,ते अद्याप परतले नसल्याची तक्रार इतर रुग्णांनी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.त्यानंतर दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.

ढवळे यांना बाहेर काढून त्यांची तत्काळ तपासणी केल्यावर त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले.  तर जिल्हा रुग्णालय  प्रशासनाने रुग्णाकडे लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी आरोप केला आहे.

Tags:    

Similar News