औरंगाबादमध्ये शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद

शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद महापालिका परीक्षेत्रात येणार्‍या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यात शाळेतील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या वर्ग पूर्णपणे बंद असतील. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू राहणार आहे.;

Update: 2021-02-23 04:46 GMT

महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी परिपत्रक काढले असून, त्यानुसार येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत वरीलप्रमाणे शाळा बंद असतील. याबरोबरच शहरात असणारे सर्व कोचिंग क्लासेस देखील 28 तारखेपर्यंत बंद रहाणार आहे.

132 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर सोमवारी आणखी 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून यात मनपा हद्दीतील 113 तर ग्रामीण भागातील 19 रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48 हजार 770 झाली असून 46हजार 574 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर 941 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Tags:    

Similar News