कोरोनाची चौथी लाट : पुन्हा लॉकडाऊन होणार का? , मंत्री विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र यापार्श्वभुमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.;

Update: 2022-06-12 02:30 GMT

जगभरात कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार का? असा प्रश्न विचारला असता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारपासून मास्कसक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. कारण आता कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंटबरोबरच चौथ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मास्कसक्तीचे आदेश दिले आहेत. मा

या मास्कसक्तीनंतर राज्यात कोरोना निर्बंध किंवा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सध्यातरी राज्यात लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नाही. कारण अजून राज्यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र जर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि इतर आरोग्य सुविधांना अडचण निर्माण झाल्यास त्याचा विचार करावा लागेल. मात्र सध्या अशा कोणत्याही प्रकारचा विचार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News