देशाच्या राजधानीत आणि आर्थिक राजधानीत कोरोनाचा उद्रेक

देशतील 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.;

Update: 2021-12-29 02:17 GMT

नवी दिल्ली // देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याबरोबर ओमायक्रॉनबाधितांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. देशतील 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोमवारी राजधानी दिल्लीत 331 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे.

वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आलेत. सध्या राजधानीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून दिल्लीत रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय. सोबतच सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आलेत. रेस्टॉरंटही 50 टक्के उपस्थितीसह सुरु आहेत.

तर, देशात 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 165 वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिल्लीत ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 67 इतका होता.

Tags:    

Similar News