Corona Update : दिलासादायक..! कोरोना रुग्णसंख्येत अल्पशी घट
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होती. मात्र शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत अल्पशी घट नोंदवली गेली.;
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर देशात कोरोनाची लाट वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत होती. मात्र गेल्या 24 तासात 3 लाख 37 हजार 704 रुग्ण आढळून आले आहेत. तर 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच 2 लाख 42 हजार 676 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे देशाचे टेन्शन वाढले होते. मात्र गेल्या 24 तासात 9 हजार 550 रुग्णांची घट झाली आहे. तर देशाच्या ओमायक्रॉन रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. यासह आतापर्यंत देशात 10 हजार 50 ओमायक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशाचे टेन्शन वाढले आहे.
शुक्रवारी देशात 3 लाख 47 हजार 254 रुग्ण आढळून आले होते. त्यात शनिवारी घट दिसून आली. मात्र 21 लाख 13 हजार 365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशात 4 लाख 88 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने बुस्टर डोसबाबत धोरण जाहीर करण्याचे निर्देश मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला दिले आहेत.