Corona and Omicron Update : ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, कोरोना रुग्णसंख्याही पावणेतीन लाखांच्या घरात
देशात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तर कोरोना रुग्णसंख्या पावणेतीन लाखांच्या घरात पोहचली आहे. मात्र मृत्यूसंख्येत अल्पशी घट नोंदवण्यात आली आहे.;
देशात नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दररोज वाढतच आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 71 हजार 202 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ही रुग्णवाढ शनिवारच्या तुलनेत 2 हजार 369 इतकी आहे. याबरोबरच सध्या देशात 15 लाख 50 हजार 317 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच देशात 314 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच सध्या देशात ओमायक्रॉन (Omiron ) रुग्णसंख्या 7 हजार 743 इतकी झाली आहे. ही रुग्णसंख्या शनिवारच्या तुलनेत 1 हजार 702 इतकी आहे. शनिवारी ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 6 हजार 41 इतकी होती.
ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 125 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत राज्याची रुग्णसंख्या 1 हजार 730 इतकी झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 889 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.