Breaking: महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा !

विजय शिवतारे आणि अजित पवारांमध्ये दिलजमाई करण्यात फडणवीसांना यश;

Update: 2024-03-28 02:42 GMT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील वाद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि शिवतारे यांच्यात एक गोपनीय बैठक झाली. या बैठकीत या दोघांतील मतभेद दूर झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

याबाबत विजय शिवतारे उद्या पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांना पाठींबा जाहीर करण्याची शक्यता आहे. यानंतर बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गातील अडसर दूर होणार आहे. विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच या मतदारसंघात आव्हान दिले होते.


Tags:    

Similar News