संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.;

Update: 2022-03-01 09:22 GMT

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपुर्वी संभाजी भिडे यांनी न्यायाधिशांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ आता देशातील डॉक्टर लुटारू असून ते मारायच्या लायकीचे आहेत, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. ते अमरावती दौऱ्यावर असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, कोरोनाच्या काळात 105 टक्के लोकांचा भीतीनेच मृत्यू झाला, असा दावा करतानाच डॉक्टर हे नालायक असून लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल केले. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आंब्यापासून मुल होणे, कोरोना हे थोतांड असल्याचा दावा, याबरोबरच ज्यांना कोरोना होत आहे ते जगायच्या लायकीचे नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

संभाजी भिडे यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत न्यायाधीशांबद्दलही अपमानजनक वक्तव्य केले होते. तर त्यापाठोपाठ आता डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून राज्यातील डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

Tags:    

Similar News