Sion Tromby Road Accident : सायन ट्रॉम्बे रस्त्यावर कंटेनर धडकला
मुंबईतील सायन-ट्रॉम्बे रस्त्यावर कंटेनरचा अपघात झाला.;
मुंबई शहरामध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये चालकाचे वेगावरचे नियंत्रण सुटल्यामुळे सायन ट्रॉम्बे रस्त्यावरील चेंबूर नाका येथे कंटेनर धडकल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहे. त्यातच मुंबई शहरात सकाळी अत्यंत कमी वाहतूक असताना सायन ट्रॉम्बे रोडवर चेंबूर नाका येथे कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र कंटेनर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली.
मानखुर्दवरून सायनच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे सायन ट्रॉम्बे रस्त्यावरील मोनोरेल चौकात नियंत्रण सुटले. त्यामुळे ब्रेक लागत नसल्याने हा कंटेनर चेंबुर नाका चौकाप्रंयंत येऊन रस्त्याच्या मध्ये ड्रमला धडकला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सकाळी अपघात झाल्याने रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. तर या अपघातामुळे सायन-ट्रॉम्बे रस्त्यावर वाहतूकीचा खोळंबा झाल्याचे पहायला मिळाले.