देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Update: 2023-08-14 05:33 GMT

देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणूकीत घोटाळा झाला आणि भाजपच्या सत्तेला हादरे बसल्यास विधानसभा निवडणुका होतील की नाही हे सांगता येत नाही. कदाचित या निवडणुका होणारच नाही, असं मोठं आणि धक्कादायक विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुका झाल्याच तर त्या कशा होतील हे देखील सांगता येत नसल्याचा दावाही चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. तसेच त्यावर अनेक तर्कवितर्कल लढवले जात आहेत.

2024ची लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्याकरिता अतंत्य महत्त्वाची आहे. देशाच्या राजकारणाची दिशा हुकूमशाहीकडे चालली आहे. रशिया आणि चीनमध्ये जे झालं तेच भारतात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळाल्यास आपला देश रशिया आणि चीनच्या दिशेने जाणार आहे. देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही, असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News