मिस्टर सदार्वतेंना १४ दिवसाची कोठडी : मिसेस सदावर्तेंना दिलासा

Update: 2022-04-18 13:04 GMT

(NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांच्या निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता.त्याप्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली आहे. याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील सहआरोपी आहेत.जयश्री पाटील यांना आता मुंबई सत्र न्यायाल्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र गुणरत्न सदावर्तेना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai session court) जयश्री पाटील यांना दिलासा दिला आहे.न्यायालयाने पोलिसांना पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर दुसरीकडे सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापर्यंत त्या न्यायालयाच्या समोर हजर झालेल्या नाही. परंतु, आता मुंबई सत्र न्यायालायाने जयश्री पाटील यांना अटकेपासून दिलासा दिला असून, त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

चार दिवसांपूर्वीच सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना न्यायालयात हजर केले होते. त्यावर न्यायालयाने सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी घडलेल्या सर्व प्रकरणांची सखोल तपासणी करण्यासाठी सदावर्तेंना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत सदावर्तेंना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Tags:    

Similar News